ग्रामपंचायत टाकळीवाडी

ता. शिरोळ, जि. कोल्हापूर

गावाची माहिती

टाकळीवाडी गाव हे सैनिक-टाकळीवाडी नावाने ओळखले जाते.या नावाप्रमाणेच या गावात फार पूर्वीपासून सैन्य दलात अनेक युवक सेवा देत आहेत.म्हणूनच या गावाला सैनिक-टाकळीवाडी या नावाने ओळखले जाते. गावची स्थापना १९६६ साली झाली.हे गाव इतर शेजारील गावाच्या मध्यभागी निसर्गरम्य वातावरणात वसलेले आहे. टाकळीवाडी गावामध्ये एकूण लोकसंख्या ३५८१ इतकी आहे.गावातील पुरुष लोकसंख्या १८२३ इतकी आहे व महिला लोकसंख्या १७५८ आहे.गावामध्ये एकूण कुटुंब संख्या ८४३ इतकी असून त्यामध्ये अनुसूचित जाती ७६६ व अनुसुचीत जमाती १९३ व सर्व साधारण जाती २६२२ इतकी आहे.

गावातील सार्वजनिक सुविधा :    टाकळीवाडी गावामध्ये सर्व समाजाची समाज मंदिरे आहेत.गावामध्ये व्यायाम शाळा,खेळाचे मैदान,स्मशानभूमी पोष्ट ऑफिस,दुग्ध संकलन केंद्र,गावतलाव,सार्वजनिक सौचालय,ग्रामपंचायत ऑफिस अशा सर्व सार्वजनिक सुविधा आहेत.गावामध्ये १२८   व नळ पाणी पुरवठा योजना कार्यरत आहे.त्यामुळे गावाला स्वच्छ व निरोगी पाणी मुबलक प्रमाणात मिळते. गावातील सर्व सार्वजनिक सुविधानवर सर्व गावकरी समाधानी आहेत.

तंटामुक्त गाव :- टाकळीवाडी गावामध्ये तंटामुक्त समितीचे स्थापना करण्यात आली असून हे गाव तंटामुक्त गाव म्हणून घोषित के गेले आहे. दर पंधरा दिवसातून एक मिटींग घेतली जाते.या मिटींग मध्ये अनेक लोकांची तक्रारीचे निवारण केले जाते. समितीचे कामकाज अध्यक्ष श्री.केंदबा श्रीकांत कांबळे व इतर सदस्य २५ इतकी आहे.या कमिटीतर्फे गावाचे तसेच गावातील इतर मान्यवर यांनी ग्रामस्थाच्या तंट्याचे निवारण करतात.

लोकसंख्या

एकूण लोकसंख्या: ३५८१ (२०११ जनगणना)

पुरुष: १८२३ | महिला: १७५८

अनुसूचित जाती: ७६६

अनुसूचित जमाती: १९३

वयोगट ०-६: ३४७

साक्षरता: पुरुष ८६.४०% | महिला ६९.४४% | एकूण ७८.०८%

भौगोलिक क्षेत्र

  • एकूण क्षेत्र: 757.62 हेक्टर
  • शेतीखालील क्षेत्र: 581.07 हेक्टर
  • गायरान क्षेत्र: 133.29 हेक्टर
  • गावठाण क्षेत्र: 22 हेक्टर

शिक्षण

गावातील एकूण ७ प्राथमिक शाळा व १ हायस्कूल (सरस्वती हायस्कूल).

अंगणवाडी केंद्रे: ४

सार्वजनिक सुविधा

  • नळ पाणी पुरवठा योजना (दुधगंगा नदीवरून)
  • ५ बोअरवेल (विद्युत पंप)
  • स्मशानभूमी: २ (शेड उपलब्ध)
  • रस्ते: १६ कि.मी. (१२ कि.मी. दुरुस्तीची गरज)
  • घनकचरा व्यवस्थापनासाठी ३ नॅडॅप प्रकल्प
  • औषध दुकाने: ४
  • खाजगी दवाखाने: २

ग्रामपंचायत सदस्य

एकूण सदस्य: १०

  • सरपंच: सौ. मंगला परशराम बिरणगे
  • ग्रामपंचायत अधिकारी: श्री. नंदकुमार पारिसा निर्मळे

ग्रामस्तरीय कर्मचारी

  • पोस्ट मास्टर: श्री. दिनकर माळगे (७७५६०११३४३)
  • प्राथमिक शाळा मुख्याध्यापक: रवींद्र सिदनाळे (९६२३५३३४७४)
  • हायस्कूल मुख्याध्यापक: संजय तपासे (९९७५५११८००)
  • आरोग्य सहाय्यक: दिलीप आटपाळे (९८६०९१८२०५)
  • पशुवैद्यकीय पर्यवेक्षक: विष्णू निर्मळे (७६२०३७७४७४)
  • ग्राम महसूल अधिकारी: राहुल सनदी (९४२३८०२००३)
  • पोलिस पाटील: सुनिता पाटील (९७६६३६२५०५)
  • विद्युत लाईनमन: सुरज बेरड (९१६८६९५५०)

संपर्क

📞 सरपंच: 9011903007

📞 ग्रामपंचायत अधिकारी: 9421102906

📧 Email: gptakaliwadi01@gmail.com

गावाची सर्वसाधारण माहिती (PDF)